सरकार औषध विक्रेत्यांच्या बाजूने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2013

सरकार औषध विक्रेत्यांच्या बाजूने

मुंबई : सर्दी, खोकला, डोकेदुखीसारख्या साध्या गोळ्यांमध्येसुद्धा रसायन असते. या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणे योग्य नसताना सरकारने औषध विक्रेत्यांना खूश करण्यासाठी मोकळे रान देऊन ही औषधे देण्यासाठी 'प्रिस्क्रिप्शन'ची मागणी केली जाणार नाही, असे विधानसभेत स्पष्ट केले आहे. रसायन कायद्याप्रमाणे सरकारची ही भूमिका चुकीची आहे, असे 'महाराष्ट्र फार्मासिस्ट वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष सुजित परमार व दक्षिण मुंबई अध्यक्ष सचिन इनामदार यांनी स्पष्ट केले.या साध्या औषधांसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज महत्त्वपूर्ण आहे. या गोळ्या कधी, कशा सेवन करायच्या? पथ्ये काय पाळायची? गोळ्या घेण्याची वेळ, यासाठी रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असा कायदा आहे. याचा सरकारने विचार का केला नाही असा सवाल परमार यांनी केला आहे. फार्मासिस्ट व आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सरकारच्या औषध विक्रेता समितीत २ फार्मासिस्ट सदस्य घेण्याचे मान्य करूनही २ सदस्य अद्याप घेतले गेलेले नाहीत, असे सचिन इनामदार यांनी सांगितले. समितीत फार्मासिस्टचा समावेश असणे नितान्त गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS