27/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : थंडी जशी हवीहवीशी वाटते तशीच ती हृदय गोठवून टाकणारीही असते. याचा प्रत्यय सध्या मुंबईकरांना येत आहे. मुंबईत सध्याच्या घडीला २0 टक्के नागरिकांचा गारठा सहन न झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई विमानतळावर एका ६५ वर्षीय गृहस्थांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. अशाप्रकारे त्यांचे प्राण बचावले.
याबाबत हृदयविकार तज्ज्ञांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अति गारठय़ामुळे रुग्णाला अस्वस्थ वाटू लागते. अनेकदा रुग्णाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झालेले असतात. परिणामी, हृदयविकाराचा धोका संभवतो. दरम्यान, मुंबईतील तापमान अनेकदा अतिशय कमी होऊन कडाक्याची थंडी पडल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. या थंडीमध्ये विशेषत: वृद्धांनी तसेच ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. रविवारी मुंबईत किमान तापमान १४ अंश सेल्सियस इतके होते. त्यामुळे हवेत प्रचंड गारवा होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत थंडी वाढली असून या थंडीमुळे वयोवृद्धांना योग्य ती काळजी घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. कमी तापमानाला रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेही रुग्णाला अस्वस्थ वाटू शकते.

No comments:
Post a Comment