भरधाव ट्रकची बसला धडक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2013

भरधाव ट्रकची बसला धडक

बेस्टचे ६ कर्मचारी जखमी - घाटकोपर येथील घटना
28/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : घाटकोपर (प.) येथील सर्वोदय जंक्शन या ठिकाणी शुक्रवारी सकाळी एका बेस्ट बसला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचालक, वाहकासह सहा बेस्ट कर्मचारी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

घाटकोपर (प.) रेल्वे स्थानकाकडून अमृतनगरच्या दिशेने निघालेल्या बेस्ट बसला सर्वोदय जंक्शनजवळ या मालवाहतूक ट्रकने समोरून धडक दिली. या धडकेत बसचालक, वाहक आणि बसमधून घाटकोपर आगाराकडे निघालेले बेस्ट कर्मचारी असे एकूण सहा जण जखमी झाले. दरम्यान, सकाळी सात वाजता घडलेल्या या अपघातातील जखमींना ताबडतोब उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी ट्रकचालक राजू निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याचे वपोनि. राजाराम व्हनमाने यांनी सांगितले. बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे व्हनमाने यांनी सांगितले. जितेंद्र कोकाटे, भगवंत महिबंद, संतोष चन्ने, गौतम नगट, बसचालक भरत घाडी आणि वाहक भरत कोंदे असे या अपघातात जखमी झालेल्या बेस्ट कर्मचार्‍यांची नावे आहेत. अपघातग्रस्त ट्रक उरणच्या जेएनपीटी बंदरातून शुक्रवारी पहाटे माल घेऊन विमानतळाकडे निघाला होता.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS