27/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २0१३ मध्ये रुग्णालये, कार्यालये तसेच अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणी ९६८ सुरक्षा रक्षकांची भरती करताना घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. या प्रकरणी चौकशी करण्याची जोरदार मागणी त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. या आरोपामुळे स्थायी समिती बैठकीत किमान वेतनावर सुरक्षा रक्षक ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर न करता स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राखून ठेवला. सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारी अर्ज करण्याऐवजी दुसरा व्यक्ती शारीरिक चाचणीत सहभागी झाला होता. त्यामुळे या गंभीर प्रकाराने घोटाळा झाल्याचे सिद्ध होते, असे देवेंद्र आंबेरकर यांनी नमूद केले. यासंदर्भात आपण पालिका आयुक्तांकडे कागदपत्रे आणि पुरावे यांसह तक्रार दिली आहे. मात्र प्रशासनाने त्यावर काय कार्यवाही केली, याची माहिती द्यायला हवी, अशी मागणी आंबेरकर यांनी केली. दरम्यान, सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्तांनी दिले.


No comments:
Post a Comment