प्लॅटफॉर्मची उंची वाढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2013

प्लॅटफॉर्मची उंची वाढणार

3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असताना लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये राहणार्‍या गॅपमध्ये पडून मृत्यू होणार्‍या प्रवाशांचे प्रमाण वाढत आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये किमान १ ते कमाल दीड फु टाचे अंतर राहत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाक डे प्लॅटफॉर्मची उंची ९२0 मिलीमीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये अंतर राहणार नाही.

उपनगरीय रेल्वे मार्गावर मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर प्रवास करत असताना गर्दीच्या वेळी लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये राहणार्‍या अंतरामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून वारंवार करण्यात येते. मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर सिमेन्सच्या लोकल गाड्या चालतात. या सिमेन्सच्या लोकल गाड्या आणि प्लॅटफॉर्ममध्ये १ फु टाचा गॅप राहतो. त्यामुळे अंपग, वृद्ध आणि महिलांना लोकलमध्ये पटकन चढता येत नाही.परिणामी, गर्दीच्या वेळेस प्रवाशांचा तोल गेल्यामुळे या गॅपमध्ये पडून अपघात होतो. अनेकदा यामध्ये प्रवाशांचा मृत्यूदेखील होतो. त्यामुळे मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील सर्वच प्लॅटफॉर्मची उंची ९२0 मिलीमीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाक डे मागितली आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्मची योग्य उंची ७६0-८४0 मिलीमीटर मानली जाते; परंतु सिमेन्सच्या लोकल गाड्यांची उंची जास्त असल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये गॅप राहत आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, तर अनेक स्थानकांत मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या पायर्‍या या वाढवण्यात आलेल्या प्ॅलटफॉर्मला घासत असल्यामुळे अनेक ठिकाणी ते शक्य नाही. त्यामुळे सिमेन्सच्या लोकल गाड्या आणि मेल-एक्स्प्रेस दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या तर प्रवाशांना सहज चढता-उतरता यावे यासाठी सुवर्ण मध्य साधत मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे प्लॅटफॅार्मची उंची ९२0 मिलीमीटर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच पश्‍चिम रेल्वे मार्गावरील १00 प्लॅटफार्मची उंची त्यानुसार वाढवण्यात येणार असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 
उपनगरीय मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या
वर्ष २0१२ मृत्यू जखमी
एकूण ३५४५ ३६४३
पुरुष ३0४१ ३१२६
महिला ६00 ४१२
इतर २ ७

वर्ष २0१३ मृत्यू जखमी
एकूण ३१९७ ३२१७
पुरुष २८५५ २४५0
महिला ३४१ ४८८
इतर ५

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS