पालिका मुख्यालयासमोर आज अभियंत्यांचे धरणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2013

पालिका मुख्यालयासमोर आज अभियंत्यांचे धरणे

मुंबई 11/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) : 
डॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेने निलंबित केलेल्या कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांना त्वरित कामावर रुजू करावे तसेच मनपा अभियंत्यांच्या विविध मागण्यांसाठी महापालिका अभियंता संयुक्त कृती समितीने गुरुवार, १२ डिसेंबर रोजी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाने निर्णय न घेतल्यास ७२ तासांचे ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियन या दोन संघटनांच्या मुंबई महापालिका अभियंता संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत महापालिकेच्या विविध खात्यात काम करणारे सुमारे ४ हजार अभियंते महापालिकेसमोर आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील, असे युनियनचे अँड़ सुखदेव काशीद व साईनाथ राज्याध्यक्ष यांनी सांगितले. डॉकयार्ड दुर्घटनेप्रकरणी पालिकेने ज्या कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांना नाहक जबाबदार धरून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्यावरील आरोप पत्र मागे घेऊन त्यांना त्वरित सेवेत घ्यावे. ज्यांना या आरोपावरून तुरुंगात डांबले आहे त्यांना कारावासातून ताबडतोब मुक्त करावे, यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, मात्र प्रशासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय न घेतल्यास येत्या १७, १८ व १९ डिसेंबर रोजी ७२ तासांचे ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS