पालिकेला उच्च पदांवर मागासवर्गीय अधिकारी नकोत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2013

पालिकेला उच्च पदांवर मागासवर्गीय अधिकारी नकोत


Displaying Copy of 1471446_332680953536901_1542233434_o.jpg

केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल
मुंबई / अजेयकुमार जाधव - 11/12/2013-  
http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) : 
मुंबई महानगर पालिकेतील विविध उच्च अधिकाराची पदे भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदे भरू नयेत अशी मागणी करणाऱ्या सत्ताधार्यांनी व प्रशासनाने पालिकेमधील उच्च पदांवर पदोन्नतीने मागासवर्गीय अधिकारी नेमावे लागणार असल्याने लोकसेवा आयोगामार्फत पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याने मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होणार असल्याने बृहन्मुंबई महानगर पालिका एससी,एसटी,व्हीजेएनटी,एसबीसी,ओबीसी इम्प्लोईज असोसिएशनने केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे धाव घेतली असून पालिकेवर कारवाही करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई महानगर पालिकेतील संचालक, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प व आयुक्त, उपआयुक्त, अभियांत्रिकी उपआयुक्त दक्षता, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन इत्यादी पदे पदोन्नतीने भरण्याभरण्यात येत होती. पदोन्नतीने भरल्यास या पदांवर मागासवर्गीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागणार असल्याने पालिकेने हि पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा सत्ताधारी आणि प्रशासनातील जातीवादी अधिकार्यांनी घाट घातला आहे. 

१० जुलै २०१३ ला सह्याद्री अतिथी गृहामध्ये केंद्रीय अनुसूचित जात जमाती आयोगाचे अध्यक्ष राजकुमार वेरखा आले  असता या पदांबाबत वेरखा यांना असोसिएशन कडून सांगितले असता वेरखा यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पदोन्नतीनेच पदे भरण्याचा सूचना दिल्या होत्या. परंतू अद्याप या सूचनांवर पालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाही केलेली नाही. यामुळे असोसिएशनचे संजय बापेरकर यांनी नवी दिल्ली येथे वेरखा यांची भेट घेवून पालिकेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाही करण्याची मागणी केली आहे. वेरखा यांनीही या प्रकरणात लक्ष घालणार असून या साठी पुढील आठवड्यात मुंबई मध्ये येवून पालिका आयुक्तांना योग्य ते आदेश देवून कारवाही करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे बापेरकर यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS