3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : पालिकेतील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी दिलेल्या वाहनांवरील चालकांना ओव्हरटाइम तसेच भत्त्यापोटी देण्यात येणार्या अतिरिक्त रकमेचा भार पेलवणे मनपा प्रशासनाला जड झाल्याने आता सेवानिवृत्त चालकांना रोजंदारीवर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष, विभागप्रमुख, पालिका अधिकारी यांच्यासाठी प्रशासनातर्फे वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात येते. मात्र अनेक चालकांना दिवसाचे १४ ते १८ तास काम करावे लागते. अतिरिक्त कामामुळे चालकांचा ओव्हरटाइम तसेच वेतन मिळून आयुक्तांच्या वेतनापेक्षा जास्त रक्कम प्रशासनाला या चालकांवर खर्च करावी लागते. त्यामुळे यापोटी होणारा मोठा खर्च वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाने पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या चालकांना रोजंदारीवर सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही चालकांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असून त्यांनी पुन्हा रोजंदारीवर सेवेत येण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे चालकांना ओव्हरटाइम तसेच भत्त्यापोटी देण्यात येणार्या पैशांची बचत होण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment