3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात बदली कर्मचारी संघटनेने राज्य शासनाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. १९८१ पासून महाराष्ट्रात गोरगरीब जनतेची सातत्यपूर्ण रुग्णसेवा करणार्या रुग्णालयीन चतुर्थ श्रेणीतील २१ दिवसांच्या तत्त्वावरील बदली कामगारांना औद्योगिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयांनी सेवेत तातडीने कायम करण्याचे निर्णय देऊनही शासनाने या कर्मचार्यांना अद्यापि सेवेत कायम केले नसल्याबाबत कर्मचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोमवारपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
सन २00४ पासून शासन-प्रशासनस्तरावर शांततामय मार्गाने,चर्चा, निवेदने, मोर्चा, निदर्शने, साखळी उपोषणे, अन्नत्याग यांसारखी आंदोलने करूनदेखील आजपर्यंत या न्याय्य मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोपही कर्मचारी संघटनेने केला आहे. शासनाच्या महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९ हजार ४४४ मंजूर पदे तसेच ७ हजार १६१ भरलेली पदे आणि २ हजार २६३ रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांची संख्या लक्षात घेता गेल्या २0 ते २५ वर्षांपासून कार्यरत असणार्या अनुभवी बदली कामगारांना कायम केल्यास रुग्णसेवा अधिक चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करता येईल. या कामगारांना सध्या नियमित शासकीय कर्मचार्यांप्रमाणे रजा, वेतनवाढ इत्यादींसारख्या कोणत्याही सवलतींचा लाभ मिळत नसल्याचेही कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment