26/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्यातील शेतकरी व शेतमजुरांना दरमहा २000 रुपये पेन्शन, तसेच राज्यातील वीज कंपन्यांचा गैरकारभार, वाढती महागाई व भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार याविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश जनता दलाने घेतला आहे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षा मेळावे घेऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. सभा, मेळावे, बैठका अशा स्वरूपाची ही जनजागरण मोहीम असणार आहे. १0 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्यात सर्वत्र तालुका व जिल्हा पातळीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी दिली आहे. जनता दलाच्या पदेश कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा जनआंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शेतकर्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, या मागणीसाठी २१ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेदरम्यान शेतकर्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १0 डिसेंबर रोजी शेतकर्यांचा महामोर्चा विधानसभेवर आल्यावर या यात्रेची सांगता झाली. मुख्यमंत्र्यांनी या वेळी निवेदन स्वीकारून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र जोपर्यंत याबाबत शासनदरबारी ठोस निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत जनता दल पाठपुरावा करत राहणार असून तसे न झाल्यास १0 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment