मुंबईत गणेशोत्सवात ४ लाख खड्डे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2013

मुंबईत गणेशोत्सवात ४ लाख खड्डे

मुंबई : गणेशोत्सवा दरम्यान रस्त्यांवर खड्डे खणणार्‍या गणेशोत्सव मंडळांना लाखोंचा दंड झाला होता. आता मुंबई महानगरपालिकेने याचसंदर्भातील एक नवी बाब समोर आणली आहे. मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान उभारलेल्या मंडपांमुळे तब्ब ल ४ लाख खड्डे झाल्याचा दावा मनपाने केला आहे. मनपाच्या या दाव्यामुळे नवा वाद उभा राहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेश मंडळांनी मुंबई महानगरपालिकेकडे मंडप उभारण्यासाठी तसेच जाहिरातींचे फलक लावण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणण्याची परवानगी मागितली होती. गणेशोत्सव संपल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने या खड्डय़ांची चक्क मोजणी केली. या मोजणीनुसार या खड्डय़ांची संख्या ४ लाख इतकी निघाली. सर्वाधिक खड्डे हे पश्‍चिम उपनगरांमध्ये दिसून आले असून यात रस्ते, फुटपाथ यांसारख्या जागांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पालिकेतील अधिकार्‍यांनी सांगितले. रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी खणण्यात येणार्‍या खड्डय़ांमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून याचे खापर अनेकदा मनपावरच फोडले जात असल्याचा आरोप काही अधिकार्‍यांकडून केला जात आहे.

गणेशोत्सव हा पावसाळ्यात येणारा सण असून रस्त्यांची दुरवस्थाही नेमकी पावसाळ्यामध्येच होते. परिणामी, ठिकठिकाणी पाणी साठत असल्याचा निष्कर्ष अनेक अधिकारी काढताना दिसत असल्याचे समजते. दरम्यान, इतक्या मोठय़ा प्रमाणावर मुंबईत केवळ गणेशोत्सवादरम्यान खड्डे आढळून आले असले तरीही अद्याप तरी संबंधित गणेश मंडळांना याबाबत दंड आकारण्याचा मनपाचा इरादा किंवा तशी योजना नसल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. मुंबईत नवसाचा गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या आणि दरवर्षी विक्रमी गर्दी होत असलेल्या एकट्या लालबागचा राजा मंडळाच्या नावावर १ हजार खड्डय़ांची नोंद असल्याचेही पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS