निमशिक्षकांचे 'इच्छामरणासाठी' राज्यपालांना साकडे! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2013

निमशिक्षकांचे 'इच्छामरणासाठी' राज्यपालांना साकडे!

30/12/2013  http://jpnnews.webs.com 
मुंबई : अनेक प्रकारचे अर्ज, विनंत्या, आंदोलने, उपोषणे करून देखील गेल्या १२-१३ वर्षांत पदरात आश्‍वासनांपलीकडे काहीच न पडल्याने आणि राज्य शासनाकडून सतत होणार्‍या फसवणुकीने निराश झालेल्या राज्यभरातील वसतिशाळा शिक्षकांनी २६ जानेवारी अर्थात गणराज्य दिनी सामूहिक इच्छामरणाची इच्छा व्यक्त करून तशी रीतसर परवानगी मिळावी म्हणून राज्यपाल शंकरनारायणन यांच्याकडे मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यातील गेल्या एक तपाहून अधिक काळ वेठबिगार म्हणून काम करणार्‍या हजारो वसतिशाळा शिक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS