देवयानींवरील आरोप मागे घ्या! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2013

देवयानींवरील आरोप मागे घ्या!

अमेरिकेतील नव्या भारतीय राजदूतांची मागणी
28/12/2013 http://jpnnews.webs.com
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडेंवर लावलेले आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत एस. जयशंकर यांनी केली आहे. अमेरिकेत निरुपमा राव यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या जयशंकर यांनी पदभार स्वीकारताच वरिष्ठ अमेरिकी अधिकार्‍यांना भेटत अमेरिकेच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.

अमेरिकेतील भारताच्या राजदूत निरुपमा राव यांच्या जागी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री वेंडी शेरमन आणि व्यवस्थापन व्यवहार उपमंत्री पॅट्रिक एफ. केनेडी यांना भेटत भारतीय उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडेंवर लावण्यात आलेले आरोप अमेरिकेने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. या प्रकरणी अमेरिकेने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त करतानाच देवयानींकडे कामाला असलेल्या मोलकरणीच्या कुटुंबीयांना अमेरिकेत आणण्याच्या पद्धतीवर आक्षेप व्यक्त केला. निरुपमा राव यांच्या जागी नव्याने पदभार स्वीकारणार्‍या जयशंकर यांनी येथील चीफ प्रोटोकॉल कार्यालयात ओळखपत्रे सादर केल्यानंतर तत्काळ शेरमन व केनेडींची भेट घेत भारताची भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण राजकीय सूट असतानाही देवयानींना अटक करून अमेरिकेने व्हिएन्ना संधीचे उल्लंघन केल्याचे जयशंकर यांनी सांगितले. भारताच्या न्यायालयीन सार्वभौमत्वाकडे काणाडोळा करत संगीता रिचर्डच्या कुटुंबीयांना अमेरिकेत आणण्याच्या पद्धतीवरही जयशंकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीविषयी आणखी तपशील मात्र देण्यात आला नाही. अमेरिकेतील भारतीय उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडेंना व्हिसा नियमावलींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अडीच लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली होती. या प्रकरणावरून दोन्ही देशांमध्ये वादंग निर्माण झाले होते. भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS