राज्यात ४.२ टक्के कुटुंबे उघड्यावरच करतात स्वयंपाक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2013

राज्यात ४.२ टक्के कुटुंबे उघड्यावरच करतात स्वयंपाक

पुरोगामी राज्य महाराष्ट्राची ओळख असून उद्योगाच्या क्षेत्रातही आघाडीवर असून राज्य विकसित असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येतो, मात्र या राज्यात आजही ४.२ टक्के कुटुंबांचा उघड्यावर संसार असून ते उघड्यावर स्वयंपाक बनवतात, तर 0.८ टक्के कुटुंबे स्वयंपाकच बनवत नाही. यात राजधानी मुंबई आघाडीवर आहे. येथे २.१ टक्के कुटुंबे स्वयंपाकच बनवत नाहीत. महाराष्ट्राची निर्मिती होऊ न आज ५0 वर्षे पूर्ण झाल्यावरही लोकांच्या घरी स्वयंपाक करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

सर्वांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी अन्न सुरक्षा कायदा लागू करत आहे. मात्र सोय नसल्याने जे 0.८ टक्के कुटुंबे स्वयंपाक करत नाही त्यांना या कायद्याचा खरंच किती फायदा, हा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींच्या वर आहे. उद्योगाच्या बाबतीत राज्य आघाडीवर असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत आहे. राज्यात ७२.७ टक्के कुटुंबांकडेच स्वयंपाक करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. २२.३ टक्के कुटुंबांकडे त्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. ४.२ टक्के कुटुंबे उघड्यावर स्वयंपाक करतात, तर 0.८ स्वयंपाकच करत नाही. उघड्यावर स्वयंपाक करण्याचा आकडा सर्वात जास्त बीडमध्ये २१.४ तर त्यापाठोपाठ १५ टक्के जालना, १२.२ टक्के परभणी, ११.४ टक्के अहमदनगर, १0.८ टक्के उस्मानाबाद, ८.७ टक्के औरंगाबाद तर नागपूरमध्ये ही टक्केवारी १.५ टक्के आहे. हा आकडा सर्वात कमी 0.२ मुंबई शहरात आहे. पुण्यातही २.२ टक्के, गडचिरोलीत ४.१ टक्के कुटुंबे उघड्यावर स्वयंपाक बनवितात. 

स्वयंपाक न करण्याची टक्केवारी सर्वात जास्त राजधानी मुंबईत २.१ टक्के आहे. त्यानंतर १.५ टक्के पुणे, रायगडमध्ये १ टक्का कुटुंब, औरंगाबादला 0.७ टक्के तर नागपूरला 0.६ कुटुंबे स्वयंपाकच बनवत नाही. अमरावतीत 0.६ तर गडचिरोलीत 0.५ टक्के कुटुंबे स्वयंपाकच करत नाही. आजही ४२.६ टक्के कुटुंबे स्वयंपाक करण्यासाठी लाकडाचा वापर करतात, तर ४३.४ टक्के एलपीजीचा वापर करतात. १.२ टक्के कुटुंब गोवर्‍याचा वापर करतात. ६.५ टक्के कुटुंब घासलेटचा, तर फक्त 0.१ टक्के कुटुंब विजेचा वापर करतात. जनगणनेतून ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS