17/12/2013- http://jpnnews.webs.com
मुंबई : अमेरिकेतील भारताच्या महावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांना अपमानास्पदरीत्या अटक करणार्या अमेरिकन प्रशासनाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अमेरिकन कॉन्स्युलेट कार्यालयावर निषेध करण्यात आला. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार अमेरिका प्रशासनाविरोधात रिपब्लिकन पक्षाने तीव्र निदर्शने केली.
रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. अमेरिका प्रशासनाने देवयानी खोब्रागडे यांचा अवमान केला असला तरी तो भारताचा अवमान झालेला आहे. त्यामुळे अमरिकेने भारताची माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केली. या निदर्शनांत रिपाइंचे गौतम सोनावणे, अभया सोनावणे, आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment