मुंबई : म्हाडाच्या सोडतीमध्ये दलालांचा हस्तक्षेप, म्हाडा भवनात दलालांचा राबता, भ्रष्टाचाराला आळा बसावा, म्हणून म्हाडाकडून आता थेट सुरक्षा महामंडळाकडूनच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असून भवनातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. म्हाडा परिसरात यापूर्वी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, मात्र सोडतीच्या पार्श्वभूमीवरच दक्षता विभागाच्या अधिकार्यांनी दलालांच्या म्हाडा भवनातील राबत्याला खीळ घातली आहे. सुरक्षा मंडळाकडून ३७ सुरक्षा रक्षक तैनात केले असून त्यात ६ महिला सुरक्षा रक्षक, ३ सुपरवायझर, २८ सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहे. हे रक्षक २४ तास कार्यरत आहेत. तसेच म्हाडा भवनात सध्या प्रत्येक मजल्यावर व्हीआयपी केबिनबाहेर १३ सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ५२ कॅमेर्यांची भर पडणार आहे. यामुळे म्हाडा भवनावर सर्वत्र कानाकोपर्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे म्हाडा भवनात दलालांना नो एंट्री बसणार आहे.
Post Top Ad
17 December 2013
Home
Unlabelled
म्हाडात आता दलालांना नो एंट्री
म्हाडात आता दलालांना नो एंट्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment