DATE - 15/12/2013 - http://jpnnews.webs.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्यावर मुंबईच्या दादर येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बाबासाहेबांनी ज्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो भारतीय साविधानामुळे मिळवून दिला. गरीब असो किवा श्रीमंत असो प्रत्येकाला समान मताचा अधिकार मिळवून दिला, ज्या समाजाला हजारो वर्षे दुर्लक्षित ठेवले गेले अशा समाजाला शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा असा संदेश देवून या समाजाला ताठ मानेने जगण्यास प्रेरित केले यामुळे बाबासाहेबांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण भारतातून लाखो आंबेडकरी जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे येत असते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांना सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजेच मुंबई महानगर पालिकेची आहे. पालिकेकडून पुरवण्यात येणारी सोयी सुविधा याची माहिती मिळावी म्हणून पालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत वृत्तपत्रातून जाहिराती देण्यात येतात. वृत्तपत्रातून या सोयी सुविधांची माहिती जाहिराती द्वारे लोकांना मिळत असताना जनसंपर्क विभागा मार्फत माहिती पुस्तिका सुद्धा प्रसिध्द केली जाते. या पुस्तिकेमध्ये पालिकेकडून दिली जाणारी बाबासाहेबांची दुर्मिळ अशी माहिती, छायाचित्र असल्याने अनेक आंबेडकरी अनुयायी या पुस्तिकेचे जतन करून ठेवत असतात.
पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या माहिती पुस्तिकेचे डिझाईन करण्यासाठी ४० ते ५० हजार रुपये लावले जातात त्याच्या छपाईसाठी वेगळा पैसा लावला जातो. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी २०१२ मध्ये मिळवलेल्या माहितीमधून माहिती पुस्तिकेच्या नावाने जास्त दर लावून भ्रष्टाचार चालला होता हे उघड झाले होते. हा भ्रष्टाचार थांबवून अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची गरज असताना मुंबईचे महापौर सुनील प्रभू व मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याने माहिती पुस्तिकेचे जास्त दराचे बिल लावूनही कोणतीही कारवाही झालेली नाही. आयुक्त कार्यालयात असलेल्या आयुक्तांच्या जवळच्या अधिकार्याला मध्यस्थी करून संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्याने आयुक्तांच्या पाया पडून कारवाही करू नका अशी विनंती केल्याने आयुक्तांनी त्यावेळी कोणतीही कारवाही केली नसल्याचे समजते.
जनसंपर्क अधिकाऱ्याला आपण काहीही केले आणि आयुक्तांच्या जवळच्या असलेल्या अधिकाऱ्याला मध्यस्थी ठेवल्यावर पाया पडून माफी मागितली कि आपल्यावर कोणतीही कारवाही होणार नाही हे माहित असल्याने या वर्षी तर या जनसंपर्क अधिकाऱ्याने ५० हजार महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिकांचा घोटाळा केला आहे. ५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईचे महापौर सुनील प्रभू, खासदार भालचंद्र मुणगेकर, राज्यमंत्री उदय सामंत, सावकारे, अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी, विर्धी पक्ष नेते बाळा आंबेरकर यांच्या उपस्थिती मध्ये या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन करताना फक्त एक बॉक्स भरून पुस्तिका शिवाजी पार्क येथे पालिकेच्या नियंत्रण कक्षामध्ये आण्याण्यात आला होता.
पुस्तिकेचे प्रकाशन करून महापौर आणि सर्व मान्यवर नियंत्रण कक्षा मधील मंचावरून खाली उतरताच काही ५० ते ६० लोकांनाच या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. महापौर शिवाजी पार्क येथून गेल्यावर लागलीच जनसंपर्क अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पत्रकारांना जेवणाची सोय केलेल्या जागी नेले. पत्रकारांच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपताच जनसंपर्क अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच या जागेवरून पाल काढला आणि थेट मुख्यालय गाठले. ५ तारखेला मुख्यालय गाठणारे जनसंपर्क अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी मुख्यालयाच्या बाहेर सुद्धा पडले नाहीत. अश्या परिस्थिती मध्ये या ५० हजार माहिती पुस्तिका कोणी, कुठे आणि कशा वाटल्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून ५० हजार माहिती पुस्तिका छापण्यात आल्या असताना वास्तविक पाहता ५ डिसेंबरला महापौर सुनील प्रभू आणि र्तर मान्यवर शिवाजी पार्क मधून गेल्यावर कोणालाही माहिती पुस्तिका मिळालेली नाही. माहिती पुस्तिकेच्या प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पत्रकारांनासुद्धा हि माहिती पुस्तिका मिळाली नव्हती. हि बाब माहिती पुस्तिकेच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या कोंडीवटे बुद्ध लेणी बचाव समितीच्या प्रकाश जाधव यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी व समितीच्या कार्यकर्त्यांनी ५ ते ७ डिसेंबर पर्यंत याठिकाणी पळत ठेवली होती. यावेळी त्यांना तीन दिवसात एकही पुस्तिका वाटली नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे दिलीप गायकवाड यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आंबेडकरांच्या नावाने अशा प्रकारे भ्रष्टाचार करणे कोणत्याही आंबेडकरी जनतेला सहन होणारे नाही यामुळे या प्रकरणाला दैनिक जनतेचा महानायक मध्ये गेले आठवडाभर चांगलीच प्रसिद्धी मिळाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. यामुळेच रिपब्लिकन सेनेच्या मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या कार्यालयात धडक देवून या प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितले असल्याचे समजते. मी फक्त दोनच साहेबांना ओळखतो एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साहेब इतर कोणत्याही साहेबाना मी ओळखत नाही असे आपल्या कार्यालयात येणाऱ्या लोकांना, पत्रकारांना छाती ठोकून नेहमी सांगणाऱ्या जनसंपर्क अधिकार्याने बाबासाहेबांच्या नावाने ५० हजार माहिती पुस्तिकांचा घोटाळा केल्याने सध्या या जनसंपर्क अधिकाऱ्याची पालिका मुख्यालयात चर्चा आहे.
मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे काही संघटनांनी जनसंपर्क अधिकाऱ्याने प्रसिद्ध केलेल्या ५० हजार माहिती पुस्तिकाबाबत शंका उपस्थित केली आहे. या पुस्तिका खरोखरच छापण्यात आल्या आहेत का? छापल्या असल्यास त्या कुठे छापण्यात आल्या? त्या पुस्तिका कोणत्या वाहनांनी शिवाजी पार्क परिसरात आणण्यात आल्या? कोणत्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि जनसंपर्क अधिकारी येथून निघून गेल्या नंतर या पुस्तिका वाटल्या ?असे कित्तेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नाची उत्तरे प्रत्तेक आंबेडकरी अनुयायी मागत आहे. या प्रश्नांची उत्तरे दादर पासून शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही क्यामेरे देवू शकतात या क्यामेरयांमध्ये या पुस्तिका उतरविताना झालेले रेकोर्डिंग, महापौर व जनसंपर्क अधिकारी शिवाजी पार्क परिसरातून गेल्या नंतर कोणत्या अधिकाऱ्याने कधी व कुठे या माहिती पुस्तिका वितरीत केल्या त्याचे रेकोर्डिंग तपासल्यास सत्य समोर येणार आहे यामुळे आयुक्त व महापौरांनी आंबेडकरी जनते समोर सत्य आणण्याची जबाबदारी घ्यायलाच हवी.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment