पालिकेतील संचालक, उपायुक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्यास स्थगिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2013

पालिकेतील संचालक, उपायुक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्यास स्थगिती

4/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील संचालक (अभियांत्रिकी व सेवाप्रकल्प) तसेच उपायुक्त (अभियांत्रिकी गट) ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा पद्धतीने भरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. त्यामुळे ही पदे सेवाज्येष्ठतेनुसार प्रमुख अभियंत्यांतून भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेतील संचालक (अभियांत्रिकी व सेवा प्रकल्प) आणि उपायुक्त (अभियांत्रिकी गट) ही दोन पदे सेवाज्येष्ठ असलेल्या प्रमुख अभियंत्यांना डावलून महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत सरळसेवा पद्धतीने भरण्याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी एकतर्फी निर्णय घेतला. म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन आणि महापालिका सभागृहाला डावलून हा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही पदावर अनुक्रमे साहेबराव सुरवसे आणि राजेश मेंदकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत अशी विनंती असोसिएशनच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली, मात्र आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केले. कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनने आयुक्तांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. कानडे आणि न्या. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन न्यायालयाने सीताराम कुंटे यांनी संचालक (अभियांत्रिकी आणि सेवा प्रकल्प) तसेच उपायुक्त (अभियांत्रिकी गट) ही दोन्ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत केलेल्या कार्यवाहीस स्थगिती दिली, असे असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. महाबळ शेट्टी आणि अँड़ सुखदेव काशिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS