धोकादायक इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2013

धोकादायक इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित

4/12/2013 http://jpnnews.webs.comमुंबई : डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर झोपेतून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने माझगाव ताडवाडी येथील पालिकेच्या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांना नोटीस बजावून घराबाहेर काढले. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरातील वीज व पाणीपुरवठाही खंडित केल्याने आता या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास नकार दिला आहे. ताडवाडी येथील बीआयटी चाळीतील १३, १४, १५, १६ या इमारती अत्यंत धोकादायक असून या इमारतींची गेल्या १0 वर्षांत डागडुजी झोलली नाही. या इमारतीमधील ३२0 खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या १00 लोकांना माझगाव तसेच जवळच्या परिसरात स्थलांतर करण्यात आले. त्यापैकी २२ खोल्यांमध्ये पालिकेचे सफाई कर्मचारी राहत होते. या रहिवाशांना पालिकेने घरे खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या. त्यानुसार मंगळवारी या ठिकाणी पोहोचलेल्या मनपा कर्मचार्‍यांनी त्या रहिवासी पालिका कर्मचार्‍यांना बाहेर काढून या धोकादायक इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. या सफाई कर्मचार्‍यांची चेंबूर येथील माहुल येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कामाच्या ठिकाणाहून हे ठिकाण दूर असल्याने तसेच जवळपास शाळेची सुविधा नसल्याने मनपा कर्मचार्‍यांनी या ठिकाणी जाण्यास नकार दर्शवला आहे. या वेळी तेथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS