पालिका अभियंत्यावर हल्ला : मनसे नगरसेवकाला नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2013

पालिका अभियंत्यावर हल्ला : मनसे नगरसेवकाला नोटीस

31/12/2013  http://jpnnews.webs.com
मुंबई : कनिष्ठ पालिका अभियंत्यावर हल्ला केल्याप्रकरणी मनसे नगरसेवक गिरीश धनुरकर यांना बृहन्मुंबई महापालिकेने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. आपल्या फोन कॉल्सना उत्तर देत नसल्याच्या रागातून धनुरकर यांनी अभियंत्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्या घटनेची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजात योग्य तो संदेश पोहोचलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोमवारी मांडली.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे पक्षाचे नगरसेवक धनुरकर यांनी ऑगस्ट महिन्यात कनिष्ठ पालिका अभियंत्यावर हल्ला केला होता. त्या घटनेमुळे पालिका कर्मचार्‍यांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हल्ला करणार्‍या नगरसेवक धनुरकर यांच्यावर कारवाईच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. कथित हल्ल्याप्रकरणी पालिकेच्या विधी विभागाने धनुरकर यांना पदावरून हटवण्यास मंजुरी दिली आहे. त्या मंजुरीनंतर आता पालिका आयुक्त कुंटे यांनी धनुरकर यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून आपणाला अपात्र का ठरवले जाऊ नये? अशी विचारणा केली आहे. धनुरकर यांना अपात्र ठरवण्याच्या दृष्टीने सध्या प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही अवधी लागेल. अंतिम कारवाई करण्यापूर्वी राज्य सरकार आणि नंतर न्यायालयात जावे लागणार असल्याचे कुंटे यांनी सोमवारी स्पष्ट केले. जर धनुरकर यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरवले गेले तर तशा कारवाईची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS