उच्च न्यायालाच्या आदेशाने "स्टार प्रवाह" वाहिनी विरोधात एट्रोसिटी गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2013

उच्च न्यायालाच्या आदेशाने "स्टार प्रवाह" वाहिनी विरोधात एट्रोसिटी गुन्हा दाखल

मुंबई / अजेयकुमार जाधव / 8 /12/2013 -  http://jpnnews.webs.com
स्टार प्रवाह वाहिनीवर लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावणारी वाक्य व दृश्य प्रसारित करण्यात आली होती. याबाबत सरकारकडे आणि पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने वाहिनीचे मालक, मालिकेचे प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, व सविता मालपेकर अभेनेत्री यांच्या विरोधात एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

स्टार प्रवाह या वाहिनीवर २३ ऑगस्ट २०१२ मध्ये  लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेमध्ये तुम्हा दोघांची दृष्ट काढते, लगीन झाल्या पासून एक दिस पण, तुम्हाला सुख मिलाला नाय, आल्या गेल्याची भूता खेतांची, म्हारा पोरांची, तरण्या ताठ्यांची, सगळ्यांचे डोळे फुटून जाऊ देत असे प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये भूता खेतांबरोबर महार समाजातील लोकांची तुलना करण्यात आल्याने जातीय व अधार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी वाहिनी व मालिके विरोधात कारवाही केली जावी म्हणून राहुल गायकवाड या तरुणाने सातत्याने सरकार आणि पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. 

पत्रांतू सरकार व पोलिसांकडून कडून कोणतीही दाखल घेतली जात नसल्याने गायकवाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर संघराज रुपवते, मिलिंद इंगोले यांनी उच्च न्यायालयात गायकवाड यांची बाजू मांडली असता न्यायालयाने गायकवाड यांची तक्रार वाडा पोलिस ठाण्यात दाखल करून वाहिनीचे मालक, मालिकेचे प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, व सविता मालपेकर अभेनेत्री यांच्या विरोधात एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार वाडा पोलिस ठाण्यात २९५(अ) , नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ ७(ग), व अनुसूचित जाती जमाती कायदा १९८९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा (२३२/ १३, दिनांक ७/१२/२०१३) दाखल करण्यात आला असून सोमवारी संबंधिताना अटक करण्यात येणार असल्याचे समजते.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS