पालिकेने कोळी बांधवांसाठी फिशर झोन आखून परवाने द्यावेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2014

पालिकेने कोळी बांधवांसाठी फिशर झोन आखून परवाने द्यावेत

मुंबई : मुंबईतील भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाच्या कोळी बांधवांसाठी महापालिकेने ठरावीक रस्त्यालगत फिशर झोन (मासळी विभाग) आखून नाममात्र शुल्कात परवाने द्यावेत, अशी मागणी नगरसेवक दीपक पवार यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. कुलाबा, वरळी, सायन, माहिम, खारदांडा, वर्सोवा, मालाड, मढ, गोराई वर्सोवा, मनोरी आदी भागात कोळी बांधव हे वस्ती करून राहतात. मासेविक्री हा या कोळी बांधवांचा प्रमुख व्यवसाय आहे, मात्र आता परप्रांतीयांनी मासेविक्री व्यवसायात घुसखेरी केल्याने मूळ निवासी कोळय़ांची पिछेहाट होत आहे. त्यामुळे पालिकेत कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी पालिकेने आपल्या हद्दीतील काही ठरावीक रस्त्यांलगत फिशर झोन (मासळी विभाग) आखून देऊन कोळी बांधवांना नाममात्र शुल्कात परवाने द्यावेत. त्यामुळे कोळी बांधवांचा परंपरागत मासेविक्रीचा आवश्यक चांगल्या प्रकारे होऊन त्यांना दिलासा मिळेल, असे दीपक पवार यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS