सीएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानक परिसराचे पालिका सुशोभीकरण करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2014

सीएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानक परिसराचे पालिका सुशोभीकरण करणार

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सीएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानक परिसराचा मुंबई महापालिका नववर्षात सुशोभीकरण व विकास करणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली. सीएसटी व चर्चगेट ही दोन महत्त्वांची रेल्वे स्थानके आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरुवात असते. प्रामुख्याने सीएसटी रेल्वे स्थानक येथे स्थानकात ये-जा करण्याच्या ठिकाणी फारच दुरवस्था झाली आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांना विदेशी पर्यटकही मोठय़ा प्रमाणात भेट देऊन पाहणी करतात. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हेरिटेज असलेल्या सीएसटी रेल्वे स्थानक व चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात सुशोभीकरण व विकासकामे करण्याचा निर्णय घेतला. सीएसटी रेल्वे स्थानक येथे सब-वेच्या ठिकाणी फारच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तेथे प्रामुख्याने सुशोभीकरण व विकासकामे केली जातील. ही कामे २0१४-१५ या वर्षातच केली जातील, मात्र त्यासाठी निधी किती लागेल हे सांगता येणार नाही, असे अति. आयुक्त श्रीनिवासन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS