पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक गुन्हा नोंदवावाच लागेल - आर. आर. पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2014

पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक गुन्हा नोंदवावाच लागेल - आर. आर. पाटील

1/1/2014  http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्यात एकवेळ गुन्हेगारीचे प्रमाण वाढले ही टीका सहन केली जाईल, मात्र पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेच नोंदले जात नाहीत, ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. बलात्काराचे गुन्हे न नोंदविणार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणारा गुन्हा मग तो बलात्काराचा असो वा इतर कोणताही गुन्हा असो त्याची नोंद करायची जबाबदारी पोलिसांना टाळता येणार नाही. एखाद्या गुन्ह्याची नोंद करण्यास जर कोणी पोलीस अधिकारी वा कर्मचारी टाळाटाळ करत असेल तर त्याची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात येईल. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आर.आर. पाटील यांनी दिला.

रे रोड येथे घडलेल्या बलात्काराची तक्रार जर पोलिसांनी नोंदवून घेतली नसेल तर हे प्रकरण गृह विभागाकडून गांभीर्याने हाताळण्यात येईल. यात ज्या कोणी अधिकार्‍याने कर्तव्यात कसूर केली असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आर.आर. पाटील म्हणाले.

पोलीस भरतीची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. मात्र पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर लाच देण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे लक्षात घेता पोलीस प्रशिक्षण केंद्रांची वरचेवर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही आर.आर. पाटील यांनी सांगितले.मरोळ पोलीस ठाण्यात असले प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS