24/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्यातील हजारो असंघटित कामगार व नाका कामगारांचे ३ जानेवारीला राज्यव्यापी जनजागृती अभियान आझाद मैदानात होणार आहे. सरकारचा या कामगारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर 'विचार बदला, सरकार बदलण्याचा इशारा बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड़ नरेश राठोड यांनी दिला आहे. राज्य सरकारकडे वारंवार मागणी करून मोर्चे, निदर्शने करूनही असंघटित कामगार व नाका कामगारांच्या समस्यांवर मार्ग काढण्यात आला नाही. त्यामुळे सरकारच्या उदासीनतेबाबत कामगारांमध्ये प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटित कामगार महामंडळ स्थापन करावे, नाका कामगार व नाके यांची नोंद करणे, या कामगारांना हक्काची घरे देणे, नाका कामगारांना जीवन विमा, आरोग्य विमा देणे तसेच त्यांच्या उत्कर्षासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे या आपल्या मागण्या असल्याचे राठोड यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment