पालिकेच्या लाचखोर अधिकार्‍यासह जकात एजंट एसीबीच्या जाळय़ात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2013

पालिकेच्या लाचखोर अधिकार्‍यासह जकात एजंट एसीबीच्या जाळय़ात

मुंबई / 11/12/2013-  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : जकात चुकवणार्‍या वाहतूक व्यावसायिकाकडे ८१ हजारांची लाच मागणार्‍या मनपाच्या जकात अधिकार्‍याबरोबरच जकात एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा लावून रंगेहाथ पकडले. कांदिवली येथील मनपाच्या यार्डमध्ये ही कारवाई करण्यात आली. 

२१ नोव्हेंबर रोजी वाहतूक व्यावसायिक यांचा टेम्पो बोईसर-तारापूर येथून माल भरून मुंबईला येत असताना दहिसर चेकनाक्यावर जकात न भरता मुंबईत प्रवेश करणार्‍या टेम्पोवर पर्यवेक्षी निरीक्षक (जकात) या मनपाच्या अधिकार्‍याने टेम्पो ताब्यात घेऊन कांदिवली (प.) येथील यार्डमध्ये जमा करून दंडासहित २ लाख १६ रुपयांची रक्कम भरण्यास टेम्पो चालकाला सांगितले. टेम्पो चालकाच्या माहितीवरून यातील फिर्यादी वाहतूक व्यावसायिकाने जकात एजंट मुकेश भरत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. ठाकूर याने संदीप नागरे यांना पैसे दिल्यास दंडाची रक्कम कमी करतील, असे सांगितले. १ लाख ३0 हजार रुपये भरल्यानंतर केवळ ४९ हजार रपयांची पावती मिळेल, उर्वरित ८१ हजार रुपये लाच म्हणून संदीप नागरे ठेवतील, असे एजंट ठाकूर याने सांगितले. फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)कडे तक्रार केली. एसीबीने तपास करून लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ९ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव येथील यार्डात एसीबीने लावलेल्या सापळय़ात जकात अधिकारी संदीप नागरे व एजंट मुकेश ठाकूर यांनी ८१ हजार ५00 रुपये लाच म्हणून स्वत:कडे ठेवल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS