हेरिटेज सुनावणीला अर्जदारांनी व्यक्तिश: हजर राहावे - मनपा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

हेरिटेज सुनावणीला अर्जदारांनी व्यक्तिश: हजर राहावे - मनपा



5/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : शिवाजी पार्क हेरिटेज प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान अर्जदारांना व्यक्तिश: हजर राहावे लागणार आहे. अर्जदारांनी स्वत: उपस्थित राहून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई वारसा जतन समितीने केलेल्या शिफारशींनुसार विद्यमान यादीचे पुनर्विलोकन आणि नव्या नियोजित यादीत समाविष्ट असलेली वारसा यादी ३१ जुलै २0१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जनतेकडून सूचना/हरकती मागवण्यासाठी या नवीन नियोजित यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि विहित कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुमारे ४0३८ सूचना/हरकती प्राप्त झाल्या. यादीचा विस्तार आणि त्यात अंतर्भूत असलेले मुद्दे विचारात घेता नवीन वारसा यादीवर प्राप्त झालेल्या सूचना/हरकती विचारात घेण्याकरिता मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांनी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव आणि मुंबई वारसा जतन समितीचे माजी अध्यक्ष दिनेश के. अफझलपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती नेमली आहे. पुनर्विलोकन समितीने ११ नोव्हेंबरपासून कामकाजाला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीवर मनपाला प्राप्त झालेल्या एकूण ४0३८ सूचना/हरकतींपैकी सुमारे ७३८ सूचना/हरकती या शिवाजी पार्क परिसराबद्दलच्या आहेत. सूचना/हरकती दाखल करणार्‍या पहिल्या १00 अर्जदारांना लेखी पूर्वसूचना देऊन नोव्हेंबर, २0१३ च्या शेवटच्या आठवड्यात पुनर्विलोकन समितीपुढे सुनावणीकरिता बोलावण्यात आले होते. त्याचप्रमाणे उर्वरित अर्जदारांना आपले म्हणणे वैयक्तिकरीत्या पुनर्विलोकन समितीपुढे सादर करण्याची संधी लवकरच क्रमश: देण्यात येईल. प्रत्येक अर्जदाराला सुनावणीची तारीख आणि वेळ सांगणारी वैयक्तिक लेखी सूचना पाठविण्यात येईल. अर्जदाराला व्यक्तिश: हजर राहावे लागेल आणि त्याकरिता कोणीही वकील/कायदेतज्ज्ञाची आवश्यकता नाही, असे मनपाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS