नागपूर विधानसभेवर मातंग समाजाचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

नागपूर विधानसभेवर मातंग समाजाचा मोर्चा

5/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने २0 डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मातंग नेते बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानात बुधवारी दिली.

८ टक्के आरक्षणाच्या प्रश्नावर अध्यादेश काढून अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. शिवाजी महाराजांचे, डॉ. बाबासाहेबांचे, लोकशाहीर अण्णाभाऊंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत युद्ध पातळीवर उभारावे. चर्मकार भवन बांधावे. अ, ब, क, ड वर्गवारी करून मातंग समाजाला अ दर्जा द्यावा. सच्चर कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. मातंग संसोधन समिती स्थापन करून ५000 कोटींची तरतूद करावी. तसेच राज्यसभा व विधान परिषदेवर मातंग प्रतिनिधी, गायराण जमिनींचा प्रश्न, महार वतनाचा प्रश्न, नोकर भरती, राणीबाग येथे अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा, मुंबई विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासन, २६ जानेवारी २0१३ पर्यंतच्या झोपड्या कायम करा, माटुंगा स्टेशनला मातंग नाव द्यावे, या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS