महिला पत्रकार लैंगिक शोषणाने त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2013

महिला पत्रकार लैंगिक शोषणाने त्रस्त

बँकॉक : जगभरातील माध्यम आणि दैनिकांमध्ये काम करणार्‍या एकूण महिलांपैकी दोन तृतीयांश महिला लैंगिक शोषण, मानसिक त्रास आणि अपमानाला सामोरे गेल्याचा धक्कादायक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. महिला पत्रकारांना कामाच्या ठिकाणी होणार्‍या जाचावर प्रसारित करण्यात आलेला हा पहिलाच अहवाल आहे. वॉशिंग्टनच्या 'आंतरराष्ट्रीय महिला माध्यम फाऊंडेशन' आणि लंडनच्या आंतरराष्ट्रीय वृत्त सुरक्षा संस्थेने विविध माध्यमांतील ८२२ महिला पत्रकारांचा अभ्यास केला. सर्व महिलांच्या मुलाखती याच वर्षी जून ते नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आल्या. त्यानुसार कामाच्या ठिकाणी सहकारी, वरिष्ठ आणि पुरुष साहेबांकडून लैंगिक शोषणाचा धोका, अपमान, जवळीकता अशा प्रकारचे कृत्य सहन करावे लागल्याची कबुली तब्बल ६४.४८ टक्के महिलांनी दिली. यापैकी बहुतांश महिला पत्रकार लैंगिक शोषण किंवा अपमान झाल्याची तक्रारसुद्धा करत नाहीत. बहुतांश महिलांनी कामाच्या ठिकाणी होणार्‍या जाचामुळे मानसिक दृष्परिणाम झाल्याचेही मान्य केले. या सर्वेक्षणास ऑस्ट्रेलिया सरकार आणि युनेस्कोने विशेष नैतिक पाठबळ दिले होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS