4/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यात योग्य दुरुस्त्या व इतर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पक्षाचे सचिव महेंद्र सिंह यांनी पत्रकार संघ येथे दिली.
विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, पीडितांचे त्वरित पुनवर्सन करावे, नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करावी, कारवाईत कसूर करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अत्याचार प्रतिबंधक कायदा सर्व धर्माच्या दलितांना लागू करावा, आर्थिक समीकरण, खाजगी क्षेत्रात आरक्षण, भूमिहीन गरीबांसह दलित आदिवासींना जमीन वाटप, देखरेख समित्यांच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्यावे, या व आदी ९ महत्त्वाच्या मागण्या घेऊन ही स्वाक्षरी मोहीम होत आहे. मोहिमेचे उद््घाटन ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता दादर रेल्वे स्टेशनजवळच्या सुविधा स्टोअर्स समोर सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न होईल, असे सिंह म्हणाले.

No comments:
Post a Comment