कोकण रेल्वेच्या 'पढेगा इंडिया'चा ११ हजार ८३९ मुलांना फायदा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2013

कोकण रेल्वेच्या 'पढेगा इंडिया'चा ११ हजार ८३९ मुलांना फायदा

31/12/2013  http://jpnnews.webs.com
मुंबई : 'पढेगा इंडिया तबी तो बढेगा इंडिया' या वाक्याला खर्‍या अर्थाने अर्थ देण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतलेला आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या शिक्षा अभियानामुळे आतापर्यंत ११ हजार ८३९ मुलांना शिकता आले आहे. कोकण रेल्वे ज्या ज्या गावातून धावते, त्या गावांमध्ये शिक्षणाचा प्रसारही करते. २0११ पासून आपल्या मार्गात येणार्‍या गावांतील मुलांना शिकविण्याचे काम कोकण रेल्वे करीत आहे.

कोकणातील आणि दक्षिणेकडील अफाट निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने आयुष्यात एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटत असते. कोकण रेल्वे ही ७४१ किमीपर्यंत पसरलेली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून कोकण रेल्वे धावते. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविण्याचे काम करीत असतानाच वाटेत येणार्‍या गावातील मुलांना संगणक आणि इंग्रजीचे धडे देण्याचे कामही कोकण रेल्वे करीत आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

कोकण रेल्वेने १४ ऑगस्ट २0११ सालापासून कोकण रेल्वे शिक्षा अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियानामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गातील ११ हजार गावांतील ११,८३९ मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. या योजनेमध्ये २0 लॅपटॉप- नोटबुक आणि २ मोबाईल व्हॅन मुलांना शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मोबाईल शिक्षा अभियानाची सुरुवात १२ मे २0१३ पासून झालेली आहे. या अभियानात मुलांच्या वेगवेगळय़ा वयोगटानुसार त्यांचा अभ्यासक्रम सेट करण्यात आलेला आहे. ९ वर्ष वयापर्यंत, १0 ते १५ वयोगटातील मुलांसाठी आणि १५ वर्षापुढील मुलांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. या योजनेअंतर्गत एका दिवशी ३ ते ४ बॅचमध्ये मुलांना शिकविले जाते. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी हे शिक्षण दिले जाते. संगणक आणि इंग्रजीचे १0 आठवड्यांमध्ये ज्ञान दिले जाते, त्यानंतर जी मुले या अभ्यासक्रमाची परीक्षा पास होतील त्यांना सर्टिफिकेटही देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे कोकण रेल्वेच्या आयटी विभागातर्फे हे अभियान चालविण्यात येते. 

स्थानिक स्टेशन मास्तरांच्या मदतीने स्थानिक सरपंच आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या मदतीने गावातील मुलांना संगणक आणि इंग्रजीचे ज्ञान दिले जाते. यामध्ये संगणकाची बेसिक माहिती, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची माहिती, गेम, इंटरनेटची माहिती मुलांना देण्यात येते. हे शिक्षा अभियान रामनगर, गुड्डामंडी, बेलापू, क्रिष्णापुरा, कोलीसरा, रिल, माणगाव, करंजाडी, दिवाणखवटी, कामोटे, भोके, आरवली, नांदगाव, सिंधुदुर्ग, बाली, माणकी आणि बारकूर या रेल्वे स्थानकांजवळील गावांमध्ये राबविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS