31/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : ग्राहकांची होत असलेली फसवणूक, त्यांचे हक्क, जागरूकता याबाबत ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणत जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या तक्रारीचा १00 दिवसांच्या आत निपटारा झाला पाहिजे. सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. अशासकीय संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकार संघ येथे केले. ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कायदे आहेत याची माहिती अनेक ग्राहकांना नसते. अनेक ग्राहक अशिक्षित आहेत. त्याचा फायदा घेत त्यांना फसवले जाते. त्यामुळे ग्राहक चळवळ व्यापक करत ती ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात राबवली पाहिजे, असे देशमुख म्हणाले.

No comments:
Post a Comment