28/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : चेंबूर येथे राहणार्या २५ वर्षीय तरुणाचा माहीम येथील बंद असलेल्या उड्डाणपुलावरून रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
चेंबूर, वाशीनाक्यातील शिव बालाजी सोसायटीत राहणारा जमीर शेख (२५) हा तरुण शुक्रवारी सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास वापरात नसलेल्या माहीम येथील रेल्वे रुळावरून गेलेल्या उड्डाणपुलावर आला. या वापरात नसलेल्या पुलावरून पडून तो पुलाच्या रेलिंगच्या आधारावर स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा रेलिंगचा हात सुटून तो रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला. ओव्हरहेड वायरच्या शॉकने जमीर होरपळून रुळावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशांनी याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी जमीरचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. जमीरचा भाजून तसेच डोक्याला मार लागून मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. जमीर हा उड्डाणपुलावरून पडला तो पूल शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, परंतु रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वे रूळ वडाळा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे या घटनेची नोंद कोणी घ्यायची याबाबत रात्री उशिरापर्यंत वाद सुरू होता, असे सांगण्यात येते.

No comments:
Post a Comment