आम्हीसुद्धा बिग बीला महायुतीच्या कार्यक्रमाला बोलवू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2013

आम्हीसुद्धा बिग बीला महायुतीच्या कार्यक्रमाला बोलवू

28/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मनसेच्या चित्रपट शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आल्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला या राजकारणाचा काहीच फायदा होणार नाही, असे सांगत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी आम्हीसुद्धा बिग बीला महायुतीच्या मंचावर बोलवू, असे मत व्यक्त केले.

पत्रकार संघात 'रिपाइं ऑफ नेपाळ' या राजकीय पक्षाच्या उद््घाटन प्रसंगी रामदास आठवले बोलत होते. छत्रभट या पक्षाचे अध्यक्ष आहेत, असे आठवले यांनी या वेळी सांगितले. पुढे बोलताना आठवले म्हणाले, महायुतीचा २0१४ चा कार्यक्रम जाहीर झाला पाहिजे, सभा, बैठका झाल्या पाहिजेत, मला परराज्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली तरी चालेल असे ते म्हणाले. 'आरक्षण' चित्रपटातील वादग्रस्त भागाचा किस्सा सांगताना आठवले म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जर मला फोन केला नसता तर अमिताभच्या बंगल्यावरील रिपाइंचे आंदोलन अटळ होते. त्यामुळे रिपाइंच्या नादाला बिग बी किंवा मनसे यांनी लागूनये, असे मत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS