पालिकेच्या १६ रुग्णालयांत जम्बो भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2013

पालिकेच्या १६ रुग्णालयांत जम्बो भरती

22 December 2013 http://jpnnews.webs.com

मुंबई - महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयांतील रिक्त पदाची ओरड आता बंद होणार आहे. येत्या तीन महिन्यांत महापालिकेच्या १६ सर्वसाधारण रुग्णालयांत परिचारिका, वॉर्डबॉय, लिपिक आदींसह तब्बल १,६०० पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच वृत्तपत्रांत जाहिरात देऊन ही पदे भरण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
महापालिकेत १ लाख १८ हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षाला हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होतात. परंतु प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या जागेवर अन्य कर्मचा-यांची नियुक्ती होण्यास विलंब होतो. महापालिकेच्या रुग्णालयांतही मोठय़ा प्रमाणावर रिक्त जागा असून, त्या भरण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मात्र उपनगरातील रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या १६ सर्वसाधारण रुग्णालयांत विविध विभागातील १,६०० रिक्त पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे उपनगरातील सर्वसाधारण रुग्णालयांतील रिक्त पदांचा तिढा सुटणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS