गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची टीका
23 December 2013 http://jpnnews.webs.com
गोव्यात या, तुम्हाला कोणताही टॅक्स नाही. पेट्रोल आमच्याकडे १८ रुपये आहे. तर तेच महाराष्ट्रात टॅक्स असल्याने ७0-८0 रुपयांच्या घरात आहे. सुमारे २२ रुपये टॅक्स सरकार वसूल करते. महाराष्ट्र सरकार या टॅक्स वसुलीतून जनतेला अक्षरक्ष: लुटत असल्याची टीका गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कल्याणात केली. दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या संचालक समाजसेवा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
दी कल्याण जनता सहकारी बँकेचा ४0वा वर्धापन दिन व संचालक समाजसेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन महावीर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी मनोहर पर्रिकर म्हणाले, गोव्यात कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. खाणी बंद झाल्यामुळे २५ टक्के उत्पन्न घटले. मात्र तरीही इंडिया टूडे मासिकात देशातील पहिल्याच पाच राज्यांमध्ये गोव्याचा क्रमांक आहे. भ्रष्टाचार कमी झाला तर काय होते हे आम्ही दाखवून दिले. त्यासाठी महसुलातील गळती थांबवण्याचे काम प्राधान्याने केले. दिल्लीत सध्या एक मृगजळ दाखविले जात आहे. लोकपाल हेच भ्रष्टाचारावर उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ते चुकीचे आहे. समाजात चोर असतील तर राजकारणातही तेच आहेत. समाजाचेच प्रतिबिंब सर्वत्र दिसते. भ्रष्टाचारावर लोकपाल हा उपाय नाही तर त्यासाठी चारित्र्यवान नेते राजकारणात यायला हवेत असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे खूप असतात. मात्र जनता सहकारी बँकेच्या संचालकांनी आपल्या सेवाभावी कार्याने ते दाखवून दिले असे पर्रिकर म्हणाले.

No comments:
Post a Comment