बुद्ध आणि त्याचा धम्म, संविधान हातोहात खपले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2013

बुद्ध आणि त्याचा धम्म, संविधान हातोहात खपले

मुंबई - प्रतिनिधी - 6 / 12 / 2013 - http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website)
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवरती दोन दिवस सुरु असलेल्या पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांची मोठी विक्री झाली असून ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ तसेच ‘संविधान’ या दोन ग्रथांना सर्वाधिक मागणी असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. 

महापरिनिर्वाण दिनाला शिवाजी पार्कवर बृहन्मुंबई महानगर पालिकेच्यावतीने वस्तु विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करुन दिले जातात. यंदा पालिकेने 450 स्टॉल्स उभारले होते. त्यातील 400 स्टॉल्स केवळ पुस्तक विक्रेत्यांना देण्यात आले होते. 

दया पवार यांचे बलुत, नरेंद्र जाधव यांचे मी आणि आमचा बाप, लक्ष्मण माने यांचे उपरा या दलित आत्मचरित्रांना यंदा उत्तम प्रतिसाद लागल्याची माहिती ग्रंथालीच्या महेश गोरेगावकर यांनी दिली. 
विठ्ठल साठे यांचे खपले देवाच्या नावाने, रामनारायण सिंह यांचे रावणाची सत्यकथा आणि चांगदेव खैरमोडे यांचे डॉ.आंबेडकर आणि हिंदु कोड बील या पुस्तिकांना वाचकांनी मोठी मागणी नोंदवल्याचे सुगावा प्रकाशनाच्या उषा वाघ म्हणाल्या.

प्रबोधकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा, भीमराव गवळी यांचे आंबेडकरी कलावंत आणि संदीप जोशी लिखीत ओबीसी धर्मांतर या पुस्तकांचीही तडाखेबंद विक्री झाल्याची माहिती नवता प्रकाशनाच्या किर्तीकुमार शिंदे यांनी दिली.

शिवाजी पार्कबाहेर पुस्तक विक्रीचे शेकडो स्टॉल्स होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता बुद्ध आणि त्याचा धम्म आणि संविधान या दोन ग्रंथाना सर्वाधिक पसंती असल्याचे समजले. या दोन्ही ग्रथांचे कर्ते स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. विशेष म्हणजे पुस्तकाच्या प्रत्येक स्टॉलवरती हे दोन ग्रंथ असल्याचे दिसून आले. दिनदर्शिकाची विक्री तडाखेबंद झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाबासाहेबांची छायाचित्रे आणि छोट्या पुतळ्यांनाही चांगली मागणी असल्याचे नागपूरच्या सुगत प्रकाशनाचे राजू पगारे म्हणाले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS