- रिपाइं आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांनी फटकारले
मुंबई - प्रतिनिधी - 6 / 12 / 2013 - http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराट्रीय स्मारक उभारण्यास आघाडी शासन कटीबद्ध असून केवळ श्रेय मिळवण्यासाठी आंदोलने उभारून स्मारकात अडथळे आणू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपाइं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी फटकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळयास पुष्पहार अर्पण करुन शुक्रवारी सकाळी आदरांजली वाहिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी केंद्रातले युपीए सरकार आणि राज्यातले आघाडी शासन कटीबध्द असून लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता विधेयक पारित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
देशाला संविधान देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका पथदर्शी होती. देशातील जनतेच्या मनात त्यांच्या प्रती असलेल्या आदर भावना लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांची आठवण चिरस्थायी रहावी. त्यासाठी त्यांचे स्मारक व्हावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
इंदू मिल ही आजारी गिरणी असल्याने तीची मालमत्ता बी.आय.एफ.आर यांच्याकडे असल्याने इंदू मिलच्या 12 एकर जागेसंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्तता आवश्यक आहे. तसेच हा भाग सीआरझेडमध्ये येतो. त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता थोडासा वेळ लागणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना स्मारकासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सल्लागारांची यादी प्राधिकरणाने तयार केली आहे. त्यांच्याकडून स्मारकाचा बृहत आराखडा तयार करुन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मारकासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ व्यक्तींच्या समितीमार्फत उत्कृष्ट वास्तूविशारदाची निवड करण्यात येईल. स्मारकाच्या सर्वोत्तम आराखडयास 1 कोटी रुपयांचे प्रथम, 50 लाख रुपयांचे द्वितीय आणि 25 लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे , मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील, संसदीय कार्य मंत्री हषवर्धन पाटील , महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री नितीन राऊत, मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री नसीम खान, खासदार एकनाथ गायकवाड, खासदार हुसेन दलवाई, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य खा. भालचंद्र मुणगेकर, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त सिताराम कुंटे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदुरकर उपस्थित होते.
आज आंदोलन नको
महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. किमान आज तरी आंदोलन करु नका, असे सांगत मुख्यमंत्री चव्हाण यांनी ‘रिपाइं’च्या इंदु मिल स्मारक भूमीपूजन आंदोलनाची जोरदार खील्ली उडवली.

No comments:
Post a Comment