मुंबई - 10/12/2013 - http://jpnnews.webs.com
| मुंबई : बेस्ट प्रशासनाला डिझेलमध्ये देण्यात येणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल बेस्ट प्रशासनातर्फे आपल्या बसेसमध्ये डिझेल भरण्यात येते. बेस्टच्या या निर्णयामुळे गेल्या ११ महिन्यांत सुमारे सात कोटींची बचत झाली आहे. सरकारी दरांप्रमाणे डिझेल खरेदीचा बोजा बेस्ट प्रशासनावर पडत होता. त्यानंतर डिझेल सरकारी नियंत्रणमुक्त करण्यात आले. त्यानंतर बेस्टने खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बेस्टच्या खर्चात बचत झाली असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सोमवारी झालेल्या बेस्ट समितीमध्ये सांगितले. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत दररोज सुमारे ६00 बसेस खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरतात. त्यामुळे प्रतिलिटर ११ ते १२ रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे ११ महिन्यांत ७ कोटी ११ लाख रुपयांची बचत झाली आहे. पवई येथे नवीन बस आगार पवई परिसरातील वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता बेस्ट प्रशासनाने पवई येथे नवीन आगार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या नवीन आगारात किमान ४00 बसेस उभ्या करण्याची क्षमता आहे. पवई, अंधेरी आणि घाटकोपर या भागांतील प्रवाशांना या आगाराचा उपयोग होणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक आगारात बसेस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नाही. ही समस्या या आगारामुळे सुटणार आहे. पवईतील आगाराची जागा ४ हजार २४५ चौ.मीटर इतकी असून त्याच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. |


No comments:
Post a Comment