बेस्टमध्ये आयटी साधनसामग्री खरेदीत भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2013

बेस्टमध्ये आयटी साधनसामग्री खरेदीत भ्रष्टाचार

मुंबई - 10/12/2013 -  http://jpnnews.webs.com 
मुंबई : बेस्टमध्ये माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित असणारी साधनसामग्री खरेदीत कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारणावरून सोमवारी झालेली बेस्ट समितीची बैठक गाजली. त्यामुळे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी गेल्या पाच वर्षांपासून आयटी विभागाशी संबंधित खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला. बेस्टच्या माहिती-तंत्रज्ञान विभागात ११३ सर्व्हर, २ हजार डेस्कटॉप, ८८ लॅपटॉप आणि १ हजार ७३२ प्रिंटर आहेत. या कॉम्प्युटर, सर्व्हर आणि अन्य वस्तूंच्या खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. बेस्ट समिती सदस्यांच्या आरोपानंतर महाव्यवस्थापक गुप्ता यांनी आयटीशी संबंधित सर्व टेंडर रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीत बेस्ट अधिकार्‍यांसह प्रशासकीय अधिकारी आणि आयटी तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS