19/12/2013- http://jpnnews.webs.com
मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरात रिलायन्स, एमएसईबी व महावितरण या कंपन्यांकडून महागड्या दरात विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र शहर विभागात बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येणार्या विद्युत पुरवठय़ाचा दर माफक आहे. या कारणास्तव उपनगरात बेस्ट उपक्रमाला विद्युत पुरवठा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
पूर्व उपनगरात कांजूर मार्ग ते भांडुप परिसरात एमएसईबी आणि मुलुंड येथे महावितरणतर्फे विद्युत पुरवठा करण्यात येतो. या वीज कंपन्यांचे दर चढे असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टला संधी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केली आहे. पश्चिम उपनगरात रिलायन्सकडून होणारा विद्युत पुरवठा महागडा आहे. गेल्या १0 वर्षांपासून उपनगरात बेस्टतर्फे विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करून त्याची दखल घेण्यात आली नाही, असे काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी म्हटले. रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानक परिसरात तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर बेस्टने ही आगार, रेल्वे स्थानके येथे बस तिकिटांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

No comments:
Post a Comment