लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे स्मारक उभे करणारच - आ. कदम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2013

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे स्मारक उभे करणारच - आ. कदम

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घर माझ्या मतदारसंघात असूनही त्या जागेवर त्यांचे स्मारक उभे राहू शकले नाही. याबद्दल खंत व्यक्त करतानाच आता मात्र लवकरच या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंचे भव्य स्मारक उभे राहाणारच, त्यासाठी माझ्यावर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला तरी चालेल; परंतु स्मारकासाठी प्रयत्न करणारच, असा ठाम निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आ. राम कदम यांनी व्यक्त केला. आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे यांच्या २१९ व्या जयंती निमित्ताने पार्क साईट सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीने आयोजित केलेल्या मातंग जनजागृती अभियानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी दिलीप लांडे, सुनीता तूपसौंदर्या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

मातंग जनजागृती अभियानांतर्गत राज्यात मातंग समाजात जनजागृती केली जात आहे. त्या अन्वये विक्रोळी पार्कसाईट येथेही हा कार्यक्रम घेण्यात आला. आ. राम कदम यांनी या वेळी राज्यातील तमाम मातंग समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले. आपण ज्या पक्षात काम करत आहोत, त्या पक्षात जातीभेदाला थारा नाही. त्यामुळेच आपण कोणत्या जातीचे आहोत हे अनेकांना ठाऊक नाही. पीडितांची सेवा हाच आपला धर्म आहे, असे सांगून मातंग समाजालाही आपण न्याय मिळवून देण्याचे काम करू, असे असेही कदम म्हणाले. तर मनसेचे दिलीप लांडे यांनी लहुजी साळवे यांची जयंती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साजरी करावी, यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS