28/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सेफ्टी सर्टिफिकेशन अँथोरिटी (इंजिनीयर) यांच्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह चेंबूर ते वडाळादरम्यानच्या मोनो मार्गाची पाहणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. हा अर्ज दाखल झाल्यानंतर जास्तीत जास्त एक महिन्याच्या कालावधीत इंजिनीयरने पाहणी करून प्रमाणपत्र देणे अपेक्षित असते.
सध्या प्रचलित असलेल्या मोनो रेल ओपनिंग रुल्सप्रमाणे मुंबईतील मोनो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यापूर्वी काही प्रशासकीय बाबी पार पाडणे आवश्यक असते. त्याला अनुसरूनच हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. गाईड-वे, स्थानके आणि स्थानकांवरील उपकरणे, विद्युतपुरवठा आणि ट्रॅक्शन संबंधी विस्तृत माहिती, देखभाल आगाराची माहिती, रोलिंग स्टॉकचा हिशोब, सिग्नल व्यवस्था आणि दळणवळण, ऑपरेशन सेफ्टी, स्थानकांवरील अग्निशमन व्यवस्था, प्रकल्प पूर्तता आणि वेगाचे प्रमाणपत्र, प्रवासी वहन क्षमता, रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यानची प्रकाश व्यवस्था इत्यादी दस्तावेज प्राधिकरणातर्फे सेफ्टी सर्टिफिकेशन अँथोरिटी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. संपूर्ण वर्षभर ट्रॅक्शन, रोलिंग स्टॉक्स, सिग्नल व्यवस्था आणि दळणवळण अशा विविध बाबींचे तीन पातळ्यांवर परीक्षण केल्यानंतर शुक्रवारी हा अर्ज प्राधिकरणातर्फे सादर करण्यात आला आहे. अँटकिन्स, लॉईड मॉट, मॅकडॉनल्ड, इंटर प्लिट आणि प्राधिकरणातर्फे स्वतंत्रपणे नेमण्यात आलेल्या स्मार्ट अशा विविध सुरक्षा सल्लागारांकडून प्रकल्पाची पूर्तता समाधानकारक झाली असल्याचा अहवाल मिळाल्यानंतरच त्यासह प्राधिकरणातर्फे अर्ज सादर करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment