महापरिनिर्वाणदिनी विशेष लोकल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

महापरिनिर्वाणदिनी विशेष लोकल

5/12/2013  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मध्य रेल्वेने गुरुवार ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर १२ विशेष लोकल सोडल्या आहेत. या लोकल दादर-कल्याण/ठाणे/कुर्ला आणि पनवेल/वाशी/मानखुर्द-दादर या मार्गावर धावतील. 

मरे वर डाऊन मार्गावर दादर-ठाणे/कल्याण/कुर्ला मार्गावरील लोकल ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री चालवण्यात येतील. दादर-ठाणे लोकल दादरहून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि ठाण्यास रात्री १.५५ वा. पोहोचेल. दादर-ठाणे लोकल रात्री १.१५ वा. सुटेल आणि ठाण्यास रा. १.५५ वा. पोहोचेल. दादर-कल्याण लोकल रात्री २.२५ वा. सुटेल आणि कल्याणला रा. ३.३५ वा. पोहोचेल. दादर-कुर्ला लोकल रात्री ३ वा. सुटेल आणि कुर्ला येथे रा. ३.१५ वा. पोहोचेल. कुर्ला-दादर ही लोकल कुर्लाहून रा. १२.४५ वा. सुटून दादर येथे रा. १ वा. पोहोचेल. कल्याण-दादर लोकल कल्याणहून रा. १ वा. सुटून दादरला रा. २.१० वा. पोहोचेल. ठाणे-दादर ही लोकल ठाण्याहून रा. २.१० वा. सुटून दादरला रा. २.५० वा. पोहोचेल. 

हार्बर मार्गावरील विशेष गाड्या व्हाया कुर्लामार्गे चालतील. दादर-मानखुर्द लोकल दादरहून रा. २.१५ वा. सुटून मानखुर्दला रा. २.४५ वा. पोहोचेल. दादर-पनवेल लोकल दादरहून रा. २.४५ वा. सुटून पनवेलला पहाटे ४ वा. पोहोचेल. दादर-वाशी लोकल दादरहून रा. ३.४५ वा. सुटून वाशीला पहाटे ४.३५ वा. पोहोचेल. वाशी-दादर लोकल रा. १.२० वा. सुटून दादरला रा. २ वा. पोहोचेल. पनवेल-दादर लोकल पनवेलहून रा. १.१५ वा. सुटून दादरला रा. २.३० वा. पोहोचेल. मानखुर्द-दादर लोकल मानखुर्दहून रा. ३ वा. सुटून दादरला ३.३० वा. पोहोचेल

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS