३८ स्थानकांवर लागणार ८३ एटीएम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2013

३८ स्थानकांवर लागणार ८३ एटीएम

मुंबई / 11/12/2013-  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : घाईघाईत एटीएममधून पैसे काढायचे म्हटले की सर्वात आधी एटीएम शोधावे लागते. उपनगरीय रेल्वेच्या अनेक स्थानकांवर एटीएमची सोयच नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या ३८ रेल्वे स्थानकांवर ८३ एटीएम (ऑटोमॅटिक टेलर मशीन) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा फायदा तर होणारच आहे शिवाय मध्य रेल्वेला ४४ करोड ७७ लाख ८ हजार ७६१ रुपये एवढे आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. 

अँक्सिस, यश, कोटक महिंद्रा, बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. या योजनेनुसार कल्याण स्थानकात पूर्वेला ४, तर पश्‍चिमेला २, डोंबिवली स्थानकात ३, कोपर स्थानकात ४, कुर्ला स्थानकात १, मानखुर्द स्थानकात ४, भायखळा स्थानकात ५, दादर स्थानकात २, गोवंडी स्थानकात ३, कलवा स्थानकात २, किंग सर्कल स्थानकात १, घाटकोपर स्थानकात १, भांडुप स्थानकात २, बदलापूर स्थानकात २, आंबिवली, आटगाव आणि आसनगाव स्थानकात प्रत्येकी १, भिवंडी स्थानकात १, सीएसटी स्थानकात ३, कर्जत-कसारा स्थानकात प्रत्येकी १, खडवली स्थानकात आणि खर्डी स्थानकात प्रत्येकी १,मस्जिद बंदर स्थानकात १, माथेरान स्थानकात १, मुंब्रा स्थानकात ४, नाहूर स्थानकात २, नेरळ स्थानकात १, पनवेल स्थानकात २, परेल स्थानकात २, ठाकुर्ली स्थानकात २, ठाणे स्थानकात ३, टिळकनगर स्थानकात ३, टिटवाळा स्थानकात २, उल्हासनगर स्थानकात ३, वासिंद स्थानकात १, तर विक्रोळी आणि विद्याविहार स्थानकात प्रत्येकी ४ एटीएम मशिन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी ७ रेल्वे स्थानकांत एटीएम लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात पैसे काढता येणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS