आतापर्यंत कारागृहातून ६०० कैदी फरार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2013

आतापर्यंत कारागृहातून ६०० कैदी फरार

नागपूर- राज्यातल्या प्रमुख कारागृहातून गेल्या ४० वर्षात तब्बल ६०० आरोपी फरार झाले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत दिली. या पैकी आता पर्यंत ७२ जणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरूद्ध कलम २२४ नुसार कारवाईही करण्यात आली आहे. उरलेल्या कैद्यांना येत्या तीन महिन्यात शोधुन काढण्यात येईल. असे तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
येरवडा कारागृहात कैद्याने केलेली आत्महत्या आणि कारागृहातून फरार झालेले कैदी या बाबतचा तारांकीत प्रश्न विनायक निम्हण, गिरीश बापट आणि शिरीष कोतवाल यांनी उपस्थित केला होता. यावेळी विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे आणि गिरीश बापट यांनी पॅरोल वर सुटलेल्या आणि फरार झालेल्या कैद्यांची माहिती मागीतली. त्यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले गेल्या ४० वर्षात राज्यातल्या कारागृहातून जवळपास ६०० कैदी फरार झाले आहेत. त्यांचा शोधही घेतला जात आहे. या अंतर्गत आता पर्यंत ७२ जणांना पकडण्यातही आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. पुढील तीन महिन्यात सर्व कैद्यांना पकडले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्यातल्या प्रमुख कारागृहा मध्ये ४५२ सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात ऑर्थर रोड, तळोजा आणि येरवडा या कारागृहांचा समावेश आहे. येरवडा कारागृहात अवैध गोष्टींची मोठी ने आण होते. अशा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमिवर कारागृहात बॅगेज स्कॅनर दिले जाणार आहेत असेही पाटील यांनी सांगितले. शिवाय काही ठिकाणी कारागृह पोलिसांच्या रिक्त जागा आहेत. त्या त्वरीत भरल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय दत्तला विशेष सुविधा नाही
येरवडा कारागृहात संजय दत्तला कोणतीही विशेष सुविधा दिली जात नाही असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्याला कारागृहातलेच अधिकारी आणि कर्मचारी मदत करतात ही बाबही त्यांनी फेटाळून लावली आहे. या फक्त अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS