आदर्श प्रकरणी पालिकेने दिलेली " एनओसी " रद्द करावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2013

आदर्श प्रकरणी पालिकेने दिलेली " एनओसी " रद्द करावी

आदर्श प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला असला तरी पालिकेने याबाबत कारवाही करावी व आदर्श प्रकरणी पालिकेने  दिलेली " एनओसी " रद्द करावी अशी मागणी पालिकेतील मनसेचे गटनेते नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे, बेस्टचे अध्यक्ष नाना आंबोले.महाव्यवस्थापक ओ.पी. गुप्ता यांना पत्र पाठवून केली आहे. 

बेस्टच्या मालकीचा बेस्ट आगर म्हणून आरक्षित असलेला भूखंड आदर्श इमारतीला लागून आहे. आदर्श इमारतीचे बांधकाम करताना या भूखंडाचा अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यात आला आहे. बस आगारासाठी असलेला भूखंड निवासी इमारतीसाठी वापरण्यात आला असल्याने एम.आर.टी.पी. अधिनियमाच्या कलम ५० चे उल्लंघन केले आहे. अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक वापरासाठी देताना तत्कालीन महाव्यवस्थापकांनी एकाधिकारशाहीचा वापर करून हि बाब कोणत्याही प्राधिकरणासमोर मान्यतेसाठी ठेवली नाही. यामुळे प्राधिकरणाच्या अधिकारावर गदा आली असल्याने अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकासाठी देण्यात आलेली " एनओसी ", " परवानगी " रद्द करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सदर करावे. तसेच दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांविरोधात एफ.आय.आर. दाखल करून कारवाही करावी अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS