2/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्य शासनाकडून दरवर्षी १ जानेवारीला रेडीरेकनर दर जाहीर करण्यात येतात. या वर्षी मेट्रो सिटी म्हणजेच महानगरपालिका विभाग अर्थात पुणे, ठाणे, नवी मुंबई व मुंबईतील रेडीरेकनर दरामध्ये २0 टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे. वरळी, नेपियन्सी रोड, अल्टामाऊंट रोड आणि कार्टर रोड येथील घरे प्रामुख्याने महागणार आहेत.
रेडीरेकनर दरामुळे २0१३-१४ मध्ये २0 हजार कोटी महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राज्य शासनाला फायदा होणार आहे. रिअल इस्टेट बाजारात मात्र या वाढीव दराने प्रत्यक्ष घरांवर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील मालमत्तेचे रजिस्ट्रेशन दर वाढणार आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २0१३ या काळात २ लाख मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंदणी झाली असून १.९८ लाख कागदपत्रे २0१२ रोजी याच कालावधीत नोंदणी करण्यात आली होती. नव्या नियमानुसार खरेदी-विक्री ज्या मालमत्तेची झाली त्या विभागातील घरांचे मुद्रांक शुल्क रेडीरेकनर दरानुसार करावे लागत आहे. रेडीरेकनर दर कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment