मुंबईत गॅस्ट्रोचे थैमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2014

मुंबईत गॅस्ट्रोचे थैमान


मुंबई : ऐन हिवाळ्यात मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान सुरूच आहे. गेल्या महिनाभरात साथीच्या आजारांचे साडेसहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक ८७२ रुग्ण असल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे. साधारणत: पावसाळ्याच्या काळात मुंबईत साथीचे आजार पसरतात. मात्र हिवाळ्यातही साथीच्या आजारांनी मुंबईकर त्रस्त आहेत. डिसेंबर महिन्यात गॅस्ट्रोचे ८७२, तापाचे ४८५३, मलेरिया ५६८, लॅप्टो १, डेंग्यू ६४, चिकनगुनिया ३, हेपेटायटीस १0३, टायफाईड ६५ व कॉलरा १ असे एकूण ६ हजार ५३0 रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात तापाचे ७२७४, मलेरियाचे ७६८, लॅप्टो ४, डेंग्यू ९६, चिकनगुनिया ५, एच १ एन १ चे २, गॅस्ट्रो ८४0, हेपेटायटिस १३६, टायफाईड १0३ आणि कॉलराचे २ रुग्ण आढळले आहेत. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका योजना राबवत असल्या तरी डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीवरून पालिका साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरली असल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS