18/1/2014
मुंबई : आमची वेगळी स्मशानभूमी, वेगळा पानवटा, वेगळी वस्ती आहे मग आम्हाला वेगळे आरक्षण का नको, असा सवाल करत मातंग नेते बाबासाहेब गोपले यांनी ८ टक्के आरक्षणासाठी ८ मे रोजी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा शुक्रवारी आझाद मैदानात ३२व्या क्रांतिचक्र परिवर्तन दिनाच्या विराट मेळाव्यात दिला. १७ जानेवारी १९८२ ला मातंगाचा कल्याण येथे संघाचा पहिला मेळावा झाला. मांगांचे मातंग म्हणून ओळख झाली. महामंडळ स्थापन केले. मातंग अभ्यास आयोग स्थापन करण्यास भाग पाडले. शासकीय वसतिगृहास मुक्ता साळवे नाव देण्याची मागणी पूर्ण करून घेतली. महाराष्ट्र फिरलो, मात्र आता ८ टक्के आरक्षण लढय़ास ६0८ दिवस आझाद मैदानात आंदोलन सुरू करून निदर्शने करत आहे. आता ८ मे ला ५00 पुरुष व ३00 महिला असे ८00 मातंग पिवळे वस्त्र परिधान करून रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी जलसमाधी घेणार, असे गोपले म्हणाले. या वेळी शेकडो मातंग कार्यकर्ते उपस्थित होते. नद्या, धरणे, कालवे, विहिरी आदी पाण्याच्या ठिकाणी राज्यभर जलसमाधी कार्यक्रम होणार आहेत.

No comments:
Post a Comment